युतीबाबतचं राज ठाकरे यांचं 'ते' कार्टून वायरल

युतीबाबतचं राज ठाकरे यांचं 'ते' कार्टून वायरल
Raj Thackeray , Cartoon

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अवनी वाघीणीची हत्या झाली त्यावेळी नोव्हेंबर 2018 मध्ये एक कार्टून काढले होते. ते कार्टून आज वास्तवात उतरले असल्याचे नेटीझन्स म्हणत असून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात युती सरकार जाऊन राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर युती सरकार पायऊतार झाले असल्यानेच हे कार्टून व्हायरल होत आहे.

राज यांनी काढलेल्या या कार्टूनमध्ये महाराष्ट्र 'अवनी' वाघीणी हत्येचा बदला घेईल अशी भविष्यवाणी केली होती. राज अवनी वाघीनीच्या हत्येला युती सरकारला जबाबदार असल्याचे दाखवले होते. 2019ला महाराष्ट्र नावाचा वाघ तुम्हाला खाऊन अवनी वाघिणीच्या हत्येचा बदला घेईल असे सांगितले होते. 2018 आणि 2019 अशा दोन फ्रेम दाखवून अवनीच्या हत्येमुळे तुम्हाला भविष्यात असा दिवस पाहावा लागेल असे आपल्या कार्टूनमध्ये दाखवले होते.

आता हे कार्टून पुन्हा व्हायरल होत असून राज ठाकरे यांची दूरदृष्टीची चर्चाही नेटीझन्स करत आहेत. दरम्यान, सध्याची महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता राजकीय चित्र काही वेगळे नाही. महाराष्ट्रात सत्तेत असलेले युती सराकार जाऊन राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. त्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे पायऊतार झाले आहेत.

Web Title: Raj Thackreays old cartoon goes viral on Social media

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com