साध्वी प्रज्ञासिंह यांची दोषमुक्ततेसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल

साध्वी प्रज्ञासिंह यांची दोषमुक्ततेसाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई : मालेगाव बॉंबस्फोट खटल्यातील मुख्य आरोपी, भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूरसह तिघांनी दोषमुक्ततेसाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर 29 जुलैला सुनावणी होणार आहे. 

राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) साध्वी प्रज्ञासिंह यांना या प्रकरणात क्‍लीन चिट दिली आहे; मात्र विशेष न्यायालयाने ती अमान्य करत त्यांना आरोपी म्हणून कायम ठेवले आहे. प्रज्ञासिंह यांच्यासोबत ले. कर्नल प्रसाद पुरोहित आणि समीर कुलकर्णी यांनीही दोषमुक्ततेसाठी याचिका दाखल केली आहे. 

न्या. इंद्रजित महंती यांच्या खंडपीठापुढे या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. आपल्याविरोधात पुरावे नसल्याचा दावा याचिकदारांच्या वतीने करण्यात आला आहे. याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश न्यायालयाने तपास यंत्रणेला दिले आहेत. 

साध्वी प्रज्ञाला तपास यंत्रणेने यापूर्वी क्‍लीन चिट दिली आहे, असे "एनआयए'च्या वतीने सांगण्यात आले. विशेष न्यायालयात सरकारी पक्षाने दाखल केलेल्या छायांकित प्रतीच्या पुराव्यांनाही आरोपींनी विरोध केला आहे.

छायांकित प्रतीच्या कागदपत्रांचा पुरावा मान्य होऊ शकत नाही, असा दावा त्यांनी केला आहे. या मुद्द्यावरही न्यायालयात सुनावणी होणार आहे. मालेगावमध्ये 2008 मध्ये झालेल्या बॉंबस्फोटात सहा ठार, तर शंभरहून अधिक जखमी झाले होते. 

Web Title : Sadhvi Pragya Singh Thakur's plea was filed in the High Court for acquittal

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com