VIDEO | मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांकडून अटक

VIDEO | मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांकडून अटक

मनसे नेते संदीप देशपांडे यांना पोलिसांनी अटक केलीय. सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपा खाली ही कारवाई करण्यात आलीय. मुंबईतल्या दादरमध्ये केवळ मनसेनं लावलेले कंदील काढल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला होता. यावरून संदीप देशपांडेंची पालिकेच्या अधिकाऱ्याशी खडाजंगी झाली होती. पालिका अधिकाऱ्यांनी मनसेचे कंदील काढले, मात्र शिवसेनेचे कंदील, झेंडे, पोस्टर्स का काढले नाहीत? असा सवाल संदीप देशपांडेंनी केला होता. 

दिवाळीचे मुख्य दिवस संपलेत. अशात तुळशीलग्नापर्यंत कंदील किंवा दिवे तसेच ठेवले जातात. आता सेनेचे कंदील BMC ने राहू देत आणि MNS चे कंदील BMC ने तसेच ठेवल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय. आपल्या वेगवेगळ्या आंदोलनांच्या माध्यमातून मनसे नेते संदीप देशपांडे कायम चर्चेत राहिलेत

Web Title : sandip deshpande arrested in mumbai 
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com