VIDEO । संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल

VIDEO । संजय राऊत लीलावती रुग्णालयात दाखल
Sanjya Raut , Shivsena , Maharashtra , Lilavati Hospital

मुंबई : शिवसेनेचे फायर ब्रँड नेते खासदार संजय राऊत यांना लिलावती रुग्णालयात दाखल केल्यानंतर शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण तयार झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर असलेली जबाबदारी शिवसेनेचे नेते सुनील परब, मिलींद नार्वेकर आणि अनिल देसाई यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

दैनंदिन धावपळीमुळ संजय राऊत यांना रुग्णालयात दाखल व्हावे लागले असल्याचे सांगण्यात आले आहे. छातीत दुखु लागल्याने रुटिंग चेक-अपसाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे त्यांचे बंधू सुनील राऊत यांनी सांगितले आहे. तर, संजय राऊत यांच्यावर रात्री आठ वाजता एन्जिओग्राफी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

डॉ. जलील पारकर हे त्यांच्यावर उपचार करणार असून त्यांची अँन्जिओग्राफी डॉ. अजित मेनन हे करणार आहेत. लिलावती रुग्णालयात हळूहळू सर्व शिवसेना नेते दाखल होत असून डॉ. दीपक सावंत हे रुग्णालयात दाखल झाले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेदेखिल लिलावती रुग्णालयात दाखल झाले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांत संजय राऊत सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रीय आहेत. जवळपास रोज दोन-तीन पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सत्ताधारी भाजपला घाम फोडला होता. शिवसेनेची भूमिका मांडण्याचे जबाबदारी पूर्णपणे संजय राऊत यांच्यावर होती. गेल्या पंधरा दिवसांत दग दग झाल्यामुळे राऊत यांची प्रकृती बिघडली आहे. त्यामुळे राऊत यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Sanjay Raut admitted to Mumbais Lilavati hospital

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com