VIDEO | आज महा-शिव-आघाडीचं चित्र स्पष्ट होणार- संजय राऊत

VIDEO | आज महा-शिव-आघाडीचं चित्र स्पष्ट होणार- संजय राऊत
Sanjay Raut

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारे साडेबाराच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मोदींशी चर्चा केली. संध्याकाळी काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. एकूणच आजचा दिवस बैठकांचा असून या बैठकांनंतर महाराष्ट्रातील सत्तास्थापनेसाठी परत बैठक घ्यावी लागणार नाही, असे संकेत मिळत आहेत.

महाराष्ट्रातील ओल्या दुष्काळासंदर्भात पवार यांनी मोदी यांची भेट घेतली. पुण्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेला जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात उपस्थित राहण्याचे निमंत्रण पवार यांनी पंतप्रधानांना दिल्याची माहिती पवार यांनी माध्यमांना दिली. मोदी यांच्याशी राजकारणावर चर्चा झाली का, या प्रश्नावर मात्र उत्तर ने देता पवार यांनी फक्त हास्य केले.

दुसरीकडे नेहमीप्रमाणे शिवसेनेचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात लोकप्रिय सरकार येणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच आजच्या बैठकांच्या सत्रानंतर राज्यात पुन्हा सत्तास्थापनेसाठी बैठका घ्याव्या लागणार नाहीत, असा आशावादही व्यक्त केला. राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि भाजप यांचे एकत्रित सरकार येणार असल्याच्या बातम्यांवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. शिवसेनेच्या विरोधातील मंडळी, अशा अफवा पसरवित असल्याचा आऱोप त्यांनी केला. 

Web Title : Sanjay Raut Press Conference

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com