VIDEO | बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, हे ठरलं होतं - संजय राऊत

VIDEO | बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, हे ठरलं होतं - संजय राऊत
Sanjay Raut, Balasaheb Thackeray , Shivsena

मुंबई : 'बंद खोलीत झालेली चर्चा ही महाराष्ट्राच्या अस्मितेची, सन्मानाची, महाराष्ट्राच्या भविष्याची होती. ही चर्चा दिल्या-घेतलेल्या वचनांची होती, त्यामुळे ती महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणणे गरजेची होती. बाळासाहेबांच्या खोलीत ही चर्चा झाली, ही खोली आमच्यासाठी मंदिर आहे, त्यामुळे त्या ठिकाणी झालेल्या चर्चेला खोटं ठरवणं हे योग्य नाही. बाळासाहेबांची शपथ घेऊन सांगतो, हे ठरलं होतं..' असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

जागावापट व समसमान फॉर्म्यूलाबाबत बंदआड झालेली चर्चा सर्वांसमोर आणायची नसते, असे वक्तव्य काल गृहमंत्री अमित शहा यांनी म्हणले होते, यावर स्पष्टीकरण देताना राऊत बोलत होते. महाराष्ट्रातील सभेत बोलताना मोदींनी प्रत्येक वेळी फडणवीसांचे नाव भविष्यातील मुख्यमंत्री म्हणून घेतले. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरेंनीही प्रत्येक सभेत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल असे सांगितले होते. पंतप्रधानांसारख्या आदरणीय माणसाला सभेत बोलताना मध्येच तोडून आमची तशी चर्चा झाली असे सांगणे योग्य नव्हते. जी चर्चा शिवसेना व अमित शहांमध्ये झाली ती चर्चा मोदींपर्यंत पोहोचलीच नाही, असा आरोप त्यांनी यावेळी केला.


'आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारांनी काम करणारे लोक आहोत. महाराष्ट्राचे राजकारण हा व्यापार नाही व आम्ही व्यापारीही नाही. त्यामुळे आम्ही जनतेला ओरबाडणार नाही. शिवसेना आणि मोदींमध्ये कोणीतरी दरी निर्माण केली आहे व योग्य गोष्टी पोहोचवल्या नाहीत,' असाही आरोप राऊतांनी यावेळी केला.

संजय राऊतांचे आज पुन्हा ट्विट
संजय राऊत यांच्या लिलावती रुग्णालयात अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना बुधवारी डिस्चार्ज देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून सतत ट्विट करणाऱ्या राऊत यांनी आजही ट्विट करून एकप्रकारे मित्रपक्षांना संदेश देत भाजपला इशारा दिला आहे. राऊत यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, की हार हो जाती जब मान लिया जाता है! जीत तब होती है जब ठान लिया जाता है! त्यामुळे त्यांनी असे लिहून आपण जिंकणारच असा संदेश एकेकाळी मित्रपक्ष असलेल्या भाजपला दिला आहे.


Web Title: Sanjay Raut speaks about shivsena and BJP s discussion before elections in press conference

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com