मुख्यमंत्रिपदावरून सेना- भाजपमध्ये पोस्टरवॉर; एकावर आदित्य ठाकरे तर एकावर फडणवीस भावी मुख्यमंत्री

मुख्यमंत्रिपदावरून सेना- भाजपमध्ये पोस्टरवॉर; एकावर आदित्य ठाकरे तर एकावर फडणवीस भावी मुख्यमंत्री

मुंबई : विधानसभा निवडणुकीनंतर हळूहळू कुरघोडीचे राजकारण सुरू झाल्याचे चित्र आहे. शिवसेना-भाजपच्या ‘आमचा मुख्यमंत्री’ स्पर्धेमुळे मुंबई विद्रूप होऊ लागली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मुख्यमंत्री पदाचे बॅनर लावल आहेत. शिवसेनेनेही शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाचे होर्डिंग्ज लावले आहेत. आमचाच मुख्यमंत्रीवरून सुरू झालेल्या स्पर्धेत मुंबई शहर मात्र भर दिवाळीत विद्रूप झाले आहे. 

शीव-कोळीवाड्यातील एका मोक्‍याच्या चौकात शिवसेनेकडून आदित्य ठाकरे मुख्यंमत्री होणार असल्याचा आणि त्याच बाजूला भाजपकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असल्याचा दावा करणारे बॅनर झळकत आहेत. मुंबईत महापालिकेने ठरवून दिलेल्या जागेवरच होर्डिंग किंवा बॅनर लावता येणार आहेत. राजकीय बॅनरला पूर्णपणे बंदी आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानेचे बंदी करण्यात आलेली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी बॅनर लावणार नाही, असे प्रतिज्ञापत्र दिले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर बॅनरबाजीला ऊत आला आहे. दिवाळी आणि नवनिर्वाचित आमदारांना शुभेच्छा देणारे बॅनर शहरभरात झळकू लागले आहेत. महापालिकेने बॅनरवर तत्काळ कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, सलग सुट्ट्यांमुळे बॅनरबाजांना मोकळे रान मिळाले आहे.

Web Title: shivsena, bjp banners for the Chief Minister post in Mumbai

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com