VIDEO | पवारांना समजण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील - संजय राऊत
Sharad Pawar , Sanjay Raut

VIDEO | पवारांना समजण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील - संजय राऊत

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना समजून घेण्यासाठी यांना 100 जन्म लागतील. ते खूप अनुभवी आहेत. त्यांना मिळालेल्या जागा या बहुमत मिळणाऱ्या नाहीत. तो सत्तास्थापनेचा कौल नाही. शरद पवार काय चुकीचे बोलले आहेत. साताऱ्यात ते मोठी लढाई लढलेले आहेत. ते भाजपविरोधात लढले आहेत. पवारांचा अनुभव दांडगा आहे, असे सांगत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पवारांची स्तुती केली.

राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस असे सरकार स्थापन होईल, अशी चर्चा सुरु असतानाच संजय राऊत दिल्लीत आहेत. संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राज्यात शिवसेनेचाच सरकार येईल, असे स्पष्ट केले आहे.

संजय राऊत म्हणाले, ''सत्ता स्थापनेविषयी शरद पवार काहीच चूक बोलत नाहीत. मोदी आगोदरपासूनच पवार माझे गुरु आहेत. मोदींच्या पवार कौतुकाकडे मी पाहातच नाही. सत्तास्थापनेबाबत बोलायचे झाले तर आता आठवलेंचे फॉर्म्युला ऐकायचेच बाकी होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीवेळी आम्हाला युतीमध्ये जायचे नव्हतेच, पण अमित शहा मातोश्रीवर आले होते. आम्ही नव्हतो गेलो त्यांच्याकडे. भाजपला राज्यात सेनेने उभे केले. शिवसेनेसारखा चांगला मित्र भाजपने गमाविलेला आहे. आम्ही फक्त दरवाजाने आत जात असतो, खिडकी वगैरे काही नसते. भाजपच्या अंताची सुरवात महाराष्ट्रातूनच झाली आहे.''

महाराष्ट्रात स्थिर सरकार येऊ नये, असे ज्यांना वाटत असेल त्यांच्या मनात गोंधळ आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतोय, की महाराष्ट्रात स्थिर सरकार निर्माण करण्यासाठी आमच्यात कोणताही गोंधळ नाही. सत्तास्थापनेचा गोंधळ माध्यमांच्या मनात आहे. स्थिर सरकार येईल हे मी निश्चित सांगतो. ज्या गोष्टी प्रक्रियेमध्ये आहेत, त्याविषयी मी बोलणार नाही. 2014 मध्ये 15 दिवस लागले होते. काश्मीरमध्येही 5-5 महिने लागले होते, अशीही आठवण राऊत यांनी करून दिली.

Web Title: Shivsena MP Sanjay Raut talked about Sharad Pawar experience in Politics

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com