शिक्षणसेवकांच्या नियुक्तीसाठी आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य 

शिक्षणसेवकांच्या नियुक्तीसाठी आता शिक्षक पात्रता परीक्षा (TET) अनिवार्य 

मुंबई - राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित तसेच अनुदानास पात्र असलेल्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदांवर शिक्षणसेवकांची नियुक्ती करण्यासाठी शिक्षण विभागाने ‘टीईटी’ (शिक्षक पात्रता परीक्षा) अनिवार्य केली आहे. 

या चाचणीत उच्चतम गुण मिळालेल्या उमेदवारांतूनच शिक्षणसेवकांची निवड करावी लागणार असल्याने खासगी संस्थांकडून होणारा भरतीचा बाजार रोखला जाणार आहे.

प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, रात्रशाळा, सरकारी अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी आणि उच्च गुणवत्ताधारकाची निवड व्हावी म्हणून ‘टीईटी’ घेण्यात येते. खासगी संस्थांमधील शिक्षकांची पदे ‘पवित्र’ या संगणकीय प्रणालीद्वारे भरण्याचाही निर्णय सरकारने घेतला आहे. या शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्‍त्या पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात, यासाठी शिक्षण विभागाने सुधारित अध्यादेश जारी केला आहे. त्यानुसार ‘टीईटी’मध्ये उच्चतम गुण मिळालेल्या उमेदवारांतून शिक्षणसेवकांची अंतिम निवड मुलाखतीद्वारे करण्यास परवानगी देण्यात आली आहे. 

शिक्षण विभागाने घेतलेल्या ‘टीईटी’मधील उच्चतम गुण मिळालेल्या उमेदवारांची निवडसूची संबंधित खासगी शैक्षणिक संस्थेच्या लॉगिनवर शिक्षण संचालक उपलब्ध करून देणार आहेत.

Web Title: 'TET' examination is now mandatory for the appointment of education seeker

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com