उद्धव ठाकरे संजय राऊतांवर रागावले...

उद्धव ठाकरे संजय राऊतांवर रागावले...
Uddhav Thackeray angry ,Sanjay Raut

सत्तास्थापनेचा दावा करणाऱ्या शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं खिंडीत गाठलं, शिवसेनेची फजिती झाल्याची टीका सर्वच स्तरातून होऊ लागली. त्यात शिवसेनेसाठी ढाल बनून आले ते लढवय्ये नेते संजय राऊत. संजय राऊत यांच्या रक्तवाहिन्यांमध्ये दोन ब्लॉक आढळल्यानं लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. अशाही अवस्थेत राऊत यांचा लढवय्या बाणा कायम असल्याचं पाहायला मिळालं.

लीलावती हॉस्पिटलमधून ट्विट करत शिवसेनेची तलवार म्यान झाली नाही, असाच इशारा राऊतांनी दिला. कोशीश करने वालों की कभी हार नही होती, अशा ओळी राऊतांनी ट्विटद्वारे लिहिल्यात. केवळ ट्विट करुन राऊत थांबले नाहीत तर सामनाचा अग्रलेख लिहिण्याची जबाबदारीही राऊतांनी लिलया पार पाडली. हाताला सलाईन लावलेल्या अवस्थेत अग्रलेख लिहितानाचा राऊतांचा फोटो व्हायरल झालाय.

15 -16  दिवसांपासून संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला होता. मुख्यमंत्रिपदावर आक्रमक असलेल्या शिवसेनेची बाजू माध्यमांमध्ये ठामपणे मांडण्याची जबाबदारी संजय राऊत यांच्यावर होती. रोज सकाळी ट्विट आणि पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत शिवसेनेची बाजू मांडत होते. 

दरम्यान, डिस्चार्ज मिळाल्यानतंर माध्यमांशी बोलताना प्रकृतीची  काळजी न घेतल्याने  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आपल्यावर रागावले होते असं संजय राऊत यांनी पत्रकारांना सांगितलं. याचसोबत उद्धव ठाकरे यांनी मला तब्बेतीची काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला असंही राऊत यांनी सांगितलं.

WebTitle : why uddhav thackeray scolds sanjay raut 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com