कलचाचणी प्रक्रियेला शिक्षण विभागाकडून मुदतवाढ

कलचाचणी प्रक्रियेला शिक्षण विभागाकडून मुदतवाढ

मुंबई - राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना करिअर निवडण्यासाठी मदत व्हावी यासाठी घेण्यात येत असलेल्या कलचाचणी प्रक्रियेला शिक्षण विभागाने मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार ५ फेब्रुवारीपर्यंत उर्वरित शाळांमध्ये कलचाचणी होणार आहे.

श्‍यामची आई फाऊंडेशन आणि शिक्षण विभाग यांच्याकडून संयुक्तरित्या दहावीतील विद्यार्थ्यांचा कल जाणून घेण्यासाठी दरवर्षी कलचाचणी घेण्यात येते. तीन वर्षांत या प्रक्रियेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १८ डिसेंबर २०१८ पासून कलचाचणीला सुरुवात झाली असून, आतापर्यंत राज्यभरातील १९ हजार २२९ शाळांनी या चाचणीसाठी नाव नोंदविले आहे. यंदा प्रथमच ही परीक्षा मोबाईलवर घेण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या चाचणीमध्ये १० लाख ६१ हजार विद्यार्थ्यांची कलचाचणी पूर्ण झाली आहे.

Web Title: This year Aptitude examinations for Class 10th will be on mobile

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com