नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नागपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार

नागपूर - मैत्रिणीच्या घरी टीव्ही पाहायला गेलेल्या १४ वर्षीय मुलीवर शेजारी राहणाऱ्या युवकाने बलात्कार केला. शारीरिक संबंधाचे मोबाईलने व्हिडिओ शूटिंग केले तसेच अश्‍लील फोटोही काढले. ही दुर्दैवी घटना सीताबर्डी परिसरात उघडकीस आली. राकेश हरीश शाहू (वय २३, रा. धरमपेठ, गवळीपुरा) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.  

आरोपी सीताबर्डीत हातठेला लावतो. आरोपीच्या वस्तीत पीडित अल्पवयीन मुलगी प्रीती (बदललेले नाव) राहते. तिचे आईवडील हातमजुरी करतात. ती नवव्या वर्गात शिकते. काही दिवसांपासून आरोपी राकेश तिचा पाठलाग करून मैत्री करण्यासाठी मागे लागला होता. मात्र, ती त्याला प्रतिसाद देत नव्हती. २५ एप्रिलला रात्री ८ वाजता प्रीती शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीच्या घरी गेली. त्या वेळी राकेश तिच्या मागावर होता. रात्री ९ वाजताच्या सुमारास ती टीव्ही बघून घरी परतत असताना राकेशने तिला अडविले. तिला बळजबरीने एका निर्माणाधीन इमारतीच्या दुसऱ्या माळ्यावर नेले. तेथील बाथरूममध्ये तिचे अश्‍लील फोटो काढले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. शारीरिक संबंधाची मोबाईलने व्हिडिओ शूटिंग केली. अश्‍लील फोटो सर्वांना दाखविण्याची धमकी तिला दिली. मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. 

आईमुळे घटना आली उघडकीस 
प्रीतीला जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतर ती तणावात वावरत असल्याची बाब आईच्या लक्षात आली. आईने तिला विश्‍वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. आई तिला घेऊन पोलिस ठाण्यात गेली.

Web Title: Girl Rape Crime

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com