मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात पकडली तब्बल 1 कोटीची रोक

 मुख्यमंत्र्यांच्या नागपुरात पकडली तब्बल 1 कोटीची रोक

नागपूर -  मतदानाचे दिवस जसजसे जवळ येत आहेत, तसतसा निवडणूक आयोगाच्या कारवाईंचा धडाका सुरु झालाय. 
मुंबईमध्ये जप्त करण्यात आलेल्या लाखो रुपयांनंतर आता बातमी येते आहे, ती थेट मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातून.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे गृहखातंही आहे, आणि अशातच आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपराजधानीतून
निवडणूक आयोगाने आतापर्यंतची सगळ्यात मोठी कारवाई केल्याचं समोर येतंय. 

नागपूरमध्ये दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये मिळूम तब्बल 1 कोटी 1 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सगळ्यात मोठी कारवाई असल्याची माहिती समोर येत आहे.
विधानसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यामुळे राज्यामधली पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.
नापगूरमध्ये निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने धडक कारवाई केली आहे.

नागपूर जिल्हा निवडणूक यंत्रणा आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत ही रक्कम जप्त केली आहे. 
पहिली कारवाई मध्य नागपुरातील पाचपावली परिसरात करण्यात आली. इथून 76 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. 
एका कारच्या डीकीमध्ये ही रोकड पेटीमध्ये ठेवण्यात आली होती. तर दुसरी कारवाई रेल्वे स्टेशनजवळच्या मानस चौकाजवळ करण्यात आली. 
काल संध्याकाळी सीताबर्डी पोलिस स्टेशनचे पथक वाहनांची तपासणी करत असताना ओला कॅरमधून 25 लाखांची रोकड हस्तगत करण्यात आली. 
ओलामध्ये प्रवास करणारे प्रवासी या रकमेबद्दल पोलिसांना समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. त्यामुळे ही रक्कम पोलिसांनी जप्त केली.

नागपूर पोलिसांनी ही रक्कम निवडणूक अधिकारी आणि आयकर अधिकाऱ्यांच्या सुपूर्द केली आहे. 
या दोन्ही प्रकरणांमध्ये सध्या चौकशी सुरू असून ही रोकड नेमकी कोणाची आहे, कुठे चालली होती याची माहिती अधिकारी घेत आहेत. 

Web Title : Nagpur Police Seized 1 Crore

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com