शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी स्वतः माझ्या डोक्यावर एक छत्र ठेवलं हा माझा सन्मान - मोदी  

शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी स्वतः माझ्या डोक्यावर एक छत्र ठेवलं हा माझा सन्मान - मोदी  

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप नाशिकमध्ये झाला. या यात्रेच्या समारोपाला मोदी उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या होत्या. 

आज सभेच्या ठिकाणी मोदींचे आगमन होताच राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले उदयनराजे भोसले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेला उपस्थित राहिले. यावेळी उदयनराजेंनी मोदींच्या डोक्यावर मोत्यांनी सजवलेली शिवकालीन पगडी घातली.

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे यांनी स्वतः माझ्या डोक्यावर एक छत्र ठेवले आहे. हा माझा सन्मान असून, त्यांच्याप्रती माझी जबाबदारी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

मोदी सभास्थळी दाखल होताच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

WebTitle : marathi news narendra modi on udayan raje and pagadi at mahajanadesh yatra concluding ceremony 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com