कर्जबाजारपणाला कंटाळून बागलाण तालुक्यातील सारदे येथील शेतकऱ्याने केली आत्महत्या

कर्जबाजारपणाला कंटाळून बागलाण तालुक्यातील सारदे येथील शेतकऱ्याने केली आत्महत्या

जायखेडा : बागलाण तालुक्यातील सारदे येथील शिवाजी निंबा कापडणीस (५५) यांनी सततची नापिकी व हातउसनवार घेतलेले पैसे तसेच बॅकेचे कर्ज, कांदा पिकाचे घसरते भाव अशा एक ना अनेक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात घराजवळ विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली

शिवाजी कापडणीस यांची सारदे येथे पत्नी वडिलांच्या नावे दहा एकर शेती असून घरातील एकूलता कर्ता पुरूष होते. पत्नीच्या नावे साधारणपणे २ लाख पासष्ट हजार तर वडिलांच्या नावे अंदाजे दहा लाखांचे कर्ज असल्याचे सांगितले जाते. शेतीमालाला हमीभाव मिळत नसून उत्पादन खर्च निघत नसल्याने कर्ज फेडावे तरी कसे या विवेचनात कापडणीस सापडले होते. सततची नापिकी व कर्जबाजारीला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा संपवली यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ऊंबरडू शिवारातील गट नंबर ४४ मधील राहत्या घराजवळ दुपारी तीनच्या सुमारास विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

दोन एकर कांदा पिकास अत्यल्प भाव मिळाला या विचारात कापडणीस होते. दहा एकर क्षेत्रात सततची नापिकी व हात उसनवार घेतलेले पैसे फेडावे तरी कसे या विवंचनेत गेल्या तीन चार दिवसांपासून सस्त झाले होते. पोलीस पाटील स्वप्निल देवरे यांनी पोलीस ठाण्यात आत्महत्येची माहिती दिली. जायखेडा पोलीस ठाण्यातील पोलीस  यांनी घटनास्थळी धाव घेतली. नामपूर ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय आधिकारी डाॅ.दिपक पाटील, गणेश आहिरे यांनी शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.जायखेडा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नामपूर दूरक्षेत्र उपनिरीक्षक एस.बी.मोरे, पो.ना.सुनिल पाटील तपास करीत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com