नाशिक | सप्तश्रृंगी देवीचं गाभाऱ्यातील दर्शन बंद! भाविकांचा हिरमोड

नाशिक | सप्तश्रृंगी देवीचं गाभाऱ्यातील दर्शन बंद!  भाविकांचा हिरमोड

सप्तश्रृंगी देवीच्या भाविकांसाठी आता एक महत्त्वाची बातमी. देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना आता गाभाऱ्याताली दर्शन मिळणार नाही. इतकंच नाही तर दर्शनासाठी अनेक कठोर नियम तयार करण्यात आलेत.

नाशिकचं सप्तश्रृंगी गडावरचं सप्तश्रृंगी देवस्थान हे राज्यातल्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ. भाविकांनी कायम गजबजलेलं देवस्थान, मात्र, यापुढे देवीचं गाभाऱ्यातलं दर्शन घेण्याची भाविकांची इच्छा अधुरीच राहणाराय. कारण नव्या वर्षाच्या सुरुवातीपासून म्हणजे 1 जानेवारीपासून गाभाऱ्यातलं दर्शन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या दर्शनासाठी अनेक कठोर नियम तयार केलेत.

केवळ आरतीसाठी नोंदणी केलेल्या भाविकांनाच पूर्णतः शुचिर्भूत झाल्यानंतर गाभाऱ्यात प्रवेश मिळू शकेल. दर्शनासाठी देवस्थान ट्रस्टनं ड्रेस कोड तयार केलाय. त्यानुसार महिलांसाठी साडी आणि पुरुषांसाठी सोवळं कम्पल्सरी असेल. देवस्थान ट्रस्टकडून शुल्क आकारून दिलं जाणारं व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलंय. देवींचं पावित्र्य कायम राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं देवस्थान ट्रस्टचं म्हणणंय.
केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरातून सप्तश्रृंगी गडावर भाविक दर्शनासाठी येत असतात. देवीचं रूप आपल्या डोळ्यांत साठवण्याची प्रत्येक भाविकाची इच्छा असते. असं असताना, अचानक गाभाऱ्यातील दर्शन बंद केल्यामुळे भाविकांचा नक्कीच हिरमोड होईल.

Web Title -  nasik saptshrungi temple new rules...

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com