धवनचा धमाकेदार #Comeback; दुखापतीनंतर झळकावले शतक

धवनचा धमाकेदार #Comeback; दुखापतीनंतर झळकावले शतक
Shikhar Dhawan

नवी दिल्ली : भारताचा सलामीवीर शिखर धवनने दुखापतीनंतर जोशात पुनरागमन केले आहे. त्याने रणजी करंडकात तिसऱ्या फेरीत दिल्लीकडून खेळताना हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात शानदार शतक झळकाविले आहे.

दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात तो 15 महिन्यांनंतर पुनरामन करत होता. या सामन्यात त्याने 147 चेंडूंमध्ये शतक झळकावत शानदार पुनरागमन केले. हे त्याचे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 25वे शतक आहे. 

सईद मुश्ताक अली स्पर्धा खेळताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती आणि त्याला 25 टाके पडले होते. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीने त्याला तंदुरुस्त घोषित केल्यावर त्याने आधी देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी20 मालिकेसाठी त्याची संघात निवड झाली आहे.

Web Title: Shikhar Dhawan Smashes Century On Return To First Class Cricket

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com