नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू

नवी मुंबईतील पांडवकडा धबधब्यात बुडून दोघांचा मृत्यू

नवी मुंबई : खारघरमधील गोल्फ कोर्सलगत असलेल्या डोंगरावर पावसाचा आनंद घेण्यासाठी आलेले सात पर्यटक ओढ्यात वाहून गेले. तीन जणांना वाचवण्यात यश आलंय तर पोलिसांना दोन मृतदेह सापडलेत. दरम्यान, दोघांचा अग्निशमन दल जवान आणि खारघर पोलिस घेत आहेत. 

पांडवकडा धबधब्यावर पर्यटकांना बंदी असल्याने मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील पर्यटक परिवारासह खारघर सेक्टर सहा गोल्फ कोर्स शेजारी असलेल्या डोंगरातून झिरपणाऱ्या पावसाच्या धारेत तर काही जवळच असलेल्या ओढ्यात पावसाचा आनंद घेतात. विशेषतः डोंगरलगत  सिडकोने ड्रायव्हिंग रेंज उभारले आहे. तिथेच रस्त्यावर वाहने उभी करून पर्यटक पावसाचा आनंद घेतात. शनिवार सकाळी नवी मुंबईतील नेरूळच्या एसआयईएस महाविद्यालयातील तरुण तरुणी पावसाचा आनंद घेण्यासाठी आले होते. त्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार तरुण डोंगरातून धमोळा पाडा येणाऱ्या ओढ्यात वाहून गेले. त्यात नेहा जैस्वाल हिचा मृतदेह हाती लागला असून तीन तरुणांची सुटका अग्निशमन जवान आणि खारघर पोलिसांनी केली आहे. तिघींचा शोध सुरू असल्याचे  खारघरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप तिदार यांनी सांगितले.
 

WebTitle : marathi news navi mumbai youngster died whil enjoying at pandavkada waterfall

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com