"विकास के नाम पे रोड बनाना बंद करो" ; गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी लावलेत धमकीचे बॅनर

"विकास के नाम पे रोड बनाना बंद करो" ; गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी लावलेत धमकीचे बॅनर

गडचिरोलीतील लेंडारी पूल सलग दुसऱ्या दिवशी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय. कालही हा पूल बंद ठेवण्यात आला होता. खबरदारीचा उपाय म्हणून आजही हा पूल बंद ठेवण्यात आलाय. दरम्यान,गडचिरोलीतल्या कालच्या हल्ल्यानंतर आता नक्षलवाद्यांनी धमकीचे बॅनर लावलेत.

गडचिरोली जिल्ह्यात पूल, रस्ते बांधणीची कामं बंद करा, अशी धमकी नक्षलवाद्यांनी सरकारला दिली आहे. सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केल्यानंतरच्या दुसऱ्याच दिवशी उत्तर गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी पोस्टर्स लावले आहेत. त्यातून सरकारला धमकी देण्यात आली आहे. 

दादापूर इथं नक्षल्यांनी 36 वाहनं जाळली होती. याच ठिकाणी आता बॅनरबाजी करत धमक्या देण्यात आल्यात. जल, जंगल आणि जमीन आदिवासींचीच आहे. असा संदेश यात देण्यात आलाय. 27 एप्रिलला भामरागड तालुक्यात झालेल्या चकमकीत कमांडर रामको आणि शिल्पा दूर्वा या दोघींना पोलिसांनी ठार केलं होतं. या घटनेचा नागरिकांनी निषेध करावा आणि फासीवादी सरकारच्या विरुद्ध एकजूट होत संघर्ष करावा, असं आवाहन करणारे बॅनर्स माओवाद्यानी दादापुरात झळकावलेत.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com