शरद पवार इंदू मिलच्या जागेची पाहणी करणार

शरद पवार इंदू मिलच्या जागेची पाहणी करणार

मुंबई : दादर येथील इंदू मिलमध्ये होणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखड्याची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे उद्या (मंगळवार) दुपारी करणार आहेत.

महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने सत्तेत येताच अनेक महत्वाच्या कामांना गती देण्याचे काम सुरू केले असून त्यामध्ये इंदू मिल मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा समावेश आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी नुकताच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलमधील प्रस्तावित स्मारकाच्या जागेची व आराखडयाची पाहणी केली होती आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन येत्या दोन वर्षांत इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक उभे करण्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी अजितदादा पवार यांनी या जागेची पाहणी शरद पवारसाहेब करणार असल्याचे जाहीर केले होते.

त्यानुसार इंदू मिलच्या जागेची व आराखड्याच्या कामाची पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार करणार आहेत. त्यांच्यासमवेत अल्पसंख्याक मंत्री व मुंबई अध्यक्ष नवाब मलिक, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेत.

Web Title ncp chief sharad pawar visit indu mill  site mumbai

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com