Loksabha 2019 : भाजपला धक्का, परेश रावल यांची लोकसभेतून माघार

Loksabha 2019 : भाजपला धक्का, परेश रावल यांची लोकसभेतून माघार

नवी दिल्ली - भाजपने 2014 मध्ये परेश रावल (गुजरात) यांना लोकसभेवर निवडून आणले होते. त्यामुळे यावेळी देखील परेश रावल लोकसभेच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. मात्र या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. परेश रावल यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. 

आपण निवडणूक लढविणार नसल्याचे आपण पार्टीला चार महिने आधीच कळविले असल्याचे परेश रावल यांनी म्हटले आहे. तसेच आपण मोदींना मात्र पाठिंबा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

काल (शुक्रवार) भाजपने 36 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामध्ये परेश रावल यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही.

2014 मध्ये परेश रावल यांनी अहमदाबाद पूर्व मधून लोकसभा निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या हिम्मत सिंह यांना तीन लाख मतांनी हरवले होते.   

Web Title: BJP MP Paresh Rawal not to contest Lok Sabha elections

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com