निर्भयाच्या दोषींना फाशीच होणार; दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

निर्भयाच्या दोषींना फाशीच होणार; दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंग याची दया याचिका केंद्रीय गृहमंत्रालायकडून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवण्यात आली होती. मात्र, ही दया याचिका राष्ट्रपतींनी तात्काळ फेटाळली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येत आहे.

राजधानी दिल्लीत 16 डिसेंबर, 2012 मध्ये निर्भया बलात्कार प्रकरण घडले होते. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. यातील दोषींना न्यायालयाकडून फाशीची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. मात्र, यातील दोषींनी राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केल्याने आता ही शिक्षा लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, आता राष्ट्रपतींनी त्यांची दया याचिका फेटाळल्याचे सांगितले जात आहे.

#WATCH Asha Devi, mother of 2012 Delhi gang-rape victim: Till now, I never talked about politics, but now I want to say that those people who held protests on streets in 2012, today the same people are only playing with my daughter's death for political gains. pic.twitter.com/FvaC89TwKI

— ANI (@ANI) January 17, 2020

दरम्यान, राष्ट्रपतींनी यातील दोषींची दया याचिका फेटाळल्याने आता या दोषींना 22 जानेवारीला फाशीची शिक्षा देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

माझ्या मुलीच्या मृत्यूचा राजकीय फायदा घेतला जातोय

मी आतापर्यंत राजकीय चर्चा केली नाही. मात्र, आता सांगू इच्छिते की, ज्या लोकांनी 2012 मध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केले, तेच लोक आज माझ्या मुलीच्या मृत्यूवर राजकीय फायदा घेण्यासाठी खेळत आहेत, असे आशा देवी यांनी म्हटले आहे. 

Webtitle: Nirbhaya case mercy petition declined by President

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com