'टॅक्स स्लॅब'मध्ये कोणतेही बदल नाही; 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 3 टक्के सरचार्ज

'टॅक्स स्लॅब'मध्ये कोणतेही बदल नाही; 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 3 टक्के सरचार्ज

अर्थसंकल्प 2019: नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी श्रीमंतांना 'कर' झटका दिला आहे. सरकारने अर्थसंकल्पात 2 कोटी रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 3 टक्के सरचार्ज लागू केला आहे. तर 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना आता 7 टक्के सरचार्ज लागणार आहे. 'जास्त कमवा जास्त कर भरा' असा संदेश निर्मला सीतारामन यांनी दिला आहे शिवाय वर्षभरात 1 कोटींपेक्षा जास्त रोख व्यवहार केल्यास 2 टक्के टीडीएस कापणार आहे. म्हणजेच जे रोखीने मोठे व्यवहार करतात त्यांना आता कर भरावा लागणार आहे. सरकारने हाती घेतलेल्या डिजिटल व्यवहारांना बळ मिळावे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. 

स्वस्त घरयोजनेअतंर्गत घर घेणाऱ्यांना 1.5 लाखांची अतिरिक्त प्राप्तिकरसवलत देण्याची घोषणा देखील अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. स्वस्त घरयोजनेअंतर्गत (अफोर्डेबल हाऊसिंग) घेतल्या जाणाऱ्या घराच्या कर्जावरील व्याजावर दीड लाखांची अतिरिक्त प्राप्तिकर सवलत देण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी केली. यामुळे स्वस्त घर योजनांना चालना मिळेल. 

'टॅक्स स्लॅब' कोणतेही बदल नाही: 
पाच लाखांवरील वार्षिक उत्पन्न असणाऱ्यांना प्राप्तिकर लागू होणार आहे. त्यामुळे 'टॅक्स स्लॅब' कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. 

स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना भरमसाठ करसूट: 
स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना मोठ्या भरमसाठ करसूट देण्याची घोषणा केली आहे. स्टार्ट अप असलेल्यांना ई व्हेरिफिकेशन करण्याचे प्रस्तावित आहे. त्यामुळे 
स्टार्ट अपसाठी कोणतीही पडताळणी होणार नाही. शिवाय स्टार्ट अप सुरु करणाऱ्यांना कोणत्याही करासंबंधित चौकशीला सामोरे जावे लागणार नाही

  • 2 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 3 टक्के सरचार्ज लागणार
  • 5 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 7 टक्के सरचार्ज लागणार
  • 1 कोटींपेक्षा जास्त रोख व्यवहार केल्यास 2 टक्के टीडीएस कापणार
  • टॅक्स स्लॅब' कोणतेही बदल नाही 
  • 45 लाखांपर्यंत घर विकत घेतल्यास 15 वर्षांच्या लोनच्या काळात 7 लाखांची बचत होईल 
  • स्टार्टअप सुरू करणाऱ्यांना भरमसाठ करसूट 

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com