VIDEO | रेशन दुकानांवर आता चिकन, मटण आणि अंडीसुद्धा मिळणार...

VIDEO | रेशन दुकानांवर आता चिकन, मटण आणि अंडीसुद्धा मिळणार...


रेशन दुकानातून गरिबांना अन्नधान्यांबरोबरच आता सवलतीच्या दरात चिकन, मटण आणि अंडीसुद्धा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे. गरिबांना पोषण आहार सहज आणि कमी किंमतीत उपलब्ध व्हावा, हा यामागे उद्देश आहे. त्या अनुषंगाने नीती आयोगाने या प्रस्तावावर काम करण्यास सुरूवात केलीय.

सध्या रेशन दुकानांवर गरिबांना गहू, तांदूळ, कडधान्ये, साखर, तेल या वस्तू सवलतीच्या दरात मिळतात. त्याच्या अनुदानापोटी सरकारला मोठी आर्थिक तरतुद करावी लागते. 

तरीही देशात कुपोषण आणि अॅनिमियासारख्या समस्या मोठ्या प्रमाणात आहेत. ही समस्या दूर करण्यासाठी नीती आयोगाकडून पुढील १५ वर्षांसाठीचं एक व्हिजन डॉक्युमेंट बनवलं जातंय. १ एप्रिल २०२० पासून लागू होणाऱ्या या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये पौष्टीक खाद्यपदार्थ आणि पोषण सुरक्षेला प्राधान्य दिले जाईल. २०१९-२० या वर्षात अन्नसुरक्षेवर १.८४ लाख कोटी खर्च अपेक्षित आहे.
सध्या रेशन दुकानांवर मिळणारं अन्नधान्य आणि इतर साहित्याचा दर्जा अगदीच वाईट आहे. त्यातच चिकन आणि मटणाच्या वाढत्या दरावरून सध्या महाराष्ट्रात आंदोलनं उभी राहतायत.ही बाब लक्षात घेता ही योजना यशस्वी होण्यासाठी मालाचा उत्तम दर्जा राखणं आणि प्रभावी अंमलबजावणी गरजेची आहे. अन्यथा एक चांगली योजना फक्त कागदावरच शिल्लक राहील.

Web Title - Now  Chicken, mutton and eggs will be available at ration shops.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com