भयंकर! आता माणसासह पशुपक्षांच्या गळ्याभोवती कोरोनाचा फास! असं झालं तर...

भयंकर! आता माणसासह पशुपक्षांच्या गळ्याभोवती कोरोनाचा फास! असं झालं तर...

कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या जगाला आणखी एक भयंकर धक्का बसलाय. कारण माणसांना जेरीस आणलेल्या कोरोनानं आता पशू-पक्षांनाही लक्ष्य केलंय. हॉंगकॉंगमधील कोरोनाग्रस्ताच्या घरातील 2 पाळीव कुत्र्यांना कोरोनाची लागण झालीय. त्याचप्रमाणे बेल्जियममध्ये 1 मांजर आणि न्यूयॉर्कच्या प्राणिसंग्रहालयातील एका वाघालाही कोरोनाची बाधा झालीय. त्यामुळे कोरोनाच्या संकटात आणखी भर पडलीय.

या प्राण्यांना कोरोनाचा धोका
वाघासोबत बिबट्या, सिंह, खवले मांजर यांना कोरोनाची लागण होऊ शकते. सर्वात धक्कादायक बाब ही की तुम्ही घरात पाळत असता ते पाळीव कुत्रे, पाळीव मांजर यांनाही कोरोनाचा धोका आहे. त्याचसोबत वन्य भागांतले इतरही प्राणी कोरोनाची शिकार बनू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आभाळभर मुक्त संचार करणारे कावळे, चिमण्यांनाही कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांना मदत करणारे बैल, म्हैस, शेळी अशा प्राण्यांनाही कोरोनाचा लागण होऊ शकते.

प्राण्यांपासून माणसाला कोरोनाची लागण होत नासल्याचा कयास तज्ज्ञांनी काढलाय. मात्र, कोरोनाग्रस्त प्राण्यांकडून माणसाला कोरोनाचा संसर्ग होतो का याबाबत आणखी संशोधन सुरूय. जर कोरोनाग्रस्त प्राण्यांकडून माणसाला कोरोनाचा संसर्ग होत असेल तर भारतासह जगासमोर मात्र मोठी डोकेदुखी ठरणारेय.

Web Title - marathi news Now corona can harm animals and birds also...

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com