आता गणेश नाईकांची बारी; नवी मुंबईतील 'या' शिवसेना नगरसेवकाचा राजीनामा...

आता गणेश नाईकांची बारी; नवी मुंबईतील 'या' शिवसेना नगरसेवकाचा राजीनामा...

नवी मुंबई - नवी मुंबईतील यंदाची महानगरपालिका निवडणूक 'हाय व्होल्टेज' होणार यात काही शंका नाही. यामध्ये नवी मुंबईचा मोठा राजकीय चेहरा गणेश नाईक यांना महाविकास आघाडीचा सामना करावा लागणारे. या आधीच तुर्भ्यातील काही भाजप नगरसेवक पक्षाला आणि अनुषंगाने गणेश नाईक यांना राम राम ठोकत शिवसेनेत गेलेत. त्यामुळे गणेश नाईकांची चिंता वाढलीये असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. अशात महाविकास आघडी फॉर्मात असताना शिवसेनेला एक धक्का बसलाय. शिवसेनेतील एका स्वीकृत नगरसेवकाने पक्षाला राम राम ठोकत भाजपात जाण्याचा निर्णय घेतलाय. 

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत इनकमिंग झालंय. याच पार्श्वभूमीवर तुर्भेटील शिवसेना नगरसेवक राजेश शिंदे यांनी स्वीकृत नगरसेवकपदाचा महानगरपालिका आयुक्तांकडे राजीनामा सुपूर्त केलाय. भाजपमधील आयारामांमुळे आता शिवसेनेत अस्वस्थता निर्माण झालीये. दरम्यान महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या राजेश शिंदे यांनी आपल्या पत्रात स्वमर्जीने स्वीकृत नगरसेवकपदाचा राजीनामा देत असल्याचा उल्लेख शिंदे केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिंदे यांचे सर समर्थक देखील लवकरच भाजपात प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय. 

नगरसेवक पदाचा राजीनामा दिल्यानंतरही राजेश शिंदे यांनी फेसबुकच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलंय. प्रभाग क्रमांक ७० मधून शिंदे निवडणूक लढवणार आहेत. मात्र कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे मात्र त्यांनी लिहिलेलं नाही. 

Web Title: marathi news  Now the turn of Ganesh Naik; Shiv Sena corporator resigns from Navi Mumbai

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com