भारत-चीन वादाचा फायदा घेतोय पाकिस्तान! नापाक कुरापती सुरूच

भारत-चीन वादाचा फायदा घेतोय पाकिस्तान! नापाक कुरापती सुरूच

भारत आणि चीन यांच्यात तणावाची स्थिती आहे तर दुसरीकडे याच संधीचा फायदा घेण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून सुरू आहे. पाकिस्तानच्या डोक्यात कोणता नापाक प्लॅन आहे.

एकीकडे सीमेवर भारत-चीन तणाव सुरू आहे. तर दुसरीकडे याचाच फायदा घेऊन पाकिस्तान भारतावर कुरघोडी करू पाहतोय. यासाठी पाकिस्ताननं दुहेरी प्लॅन आखलाय. पाकिस्ताननं उत्तर लडाखच्या उत्तर भागात आपलं सैन्य वाढवलंय. गिलगिट आणि बाल्टिस्तान भागात पाकनं 20 हजार जादा सैनिक तैनात केले आहेत. तर दुसरीकडे चीनचं लष्कर अल ब्रद या दहशतवाद्यांच्या संपर्कात आहे. पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय चीनी लष्कर आणि अल बद्रच्या माध्यमातून भारतात दहशतवादी कारवाया करण्याची तयारी करतेय.

 सुत्रांच्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तान आणि चीन 100 दहशतवाद्यांची मदत घेणारंय. तर दुसरीकडे भारतानेही दहशतवादाविरोधात आक्रमक पवित्रा घेताय. या वर्षात 120 हून अधिक दहशतवादी ठार करण्यात यश आलंय. त्यामुळे भारताला शह देण्यासाठी पाकिस्ताननं कितीही मनसुबे आखले तरी त्यात पाकिस्तान कदापी यशस्वी होणार नाही. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com