पंकजा मुंडेंच्या पक्षांतराला पुर्णविराम?

पंकजा मुंडेंच्या पक्षांतराला पुर्णविराम?

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केलेल्या फेसबुक पोस्टमुळे गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात चांगलाच कल्लोळ माजला आहे. यातच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पंकजा मुंडे शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे विधान केल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली. भाजप नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही अफवा असल्याचे सांगितले. परंतु या सर्वावर पंकजा यांची कोणतीच प्रतिक्रीया न आल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. असे असले तरी पंकजा मुंडे यांनी आज केलेल्या पोस्टमध्ये पुन्हा 'कमळ' दिसले आहे. त्यामुळे भाजप पक्ष सोडण्याच्या आणि सेनेच्या वाटेवर असण्याच्या चर्चेला नवे वळण लागले आहे. 


काल शिवसेना खासदार संजय राऊत यांना पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टसंदर्भात विचारले असता पंकजा मुंडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे भाजपला सोडचिट्टी देणार का? अशा वावटळ्या उठल्या. परंतु भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे, तसेच खासदार पुनम महाजन यासर्व भाजप नेत्यांनी पंकजाताई शिवसेनेच्या वाटेवर जाण्याच्या चर्चेला पुर्णविराम देत ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. परंतु या सर्व घडमोडीवर पंकजा मुंडे यांची कोणतीच प्रतिक्रीया आलेली नाही. त्यामुळे जनेतच्या डोक्यावर पंकजा मुंडे यांच्या भुमिकेची अद्याप टांगती तलवार आहे. असे म्हणायला हरकत नाही. 


आज भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांची १३६ वी जयंती आहे. यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करून डॉ. राजेंद्र प्रसाद यांना विनम्र अभिवादन केले आहे. त्यांच्या या पोस्टमध्ये त्यांनी भाजपचे चिन्ह कमळ याचा देखील वापर केला आहे. त्यामुळे पंकजा यांच्या पक्षांतर करण्याच्या चर्चेला कुठेतरी पुर्णविराम मिळला आहे.
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com