पेट्रोल-डिझेलवर येणार बंदी?

पेट्रोल-डिझेलवर येणार बंदी?

तुमची पेट्रोल-डिझेलची गाडी भंगारात जाणार? पेट्रोल-डिझेलवर येणार बंदी? पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या गाड्या होणार कायमच्या हद्दपार? धक्का बसला ना.. तुम्ही जर एखादी नवी कोरी कार किंवा बाइक खरेदी केली असेल तर हा धक्का अधिकच असेल. 

अवघ्या भारतभरातील वाहनं अगदी किरकोळ अपवाद सोडला तर पेट्रोल-डिझेलवरच धावतात. पेट्रोल-डिझेलवरील वाहनांमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होतं. इंधनाची कमतरता लक्षात घेऊन या वाहनांचं उत्पादन बंद करण्यात आलंय. त्यामुळे आता फक्त इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर भर द्यावा

अशा आशयाच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून पसरत आहेत. या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही पर्यावरण वाचवण्यासाठी इंधन आयातीत कपात करण्यात आल्याचं वक्तव्य केलं होतं. तसंच इलेक्ट्रिक वाहन खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असेही म्हटले होते.

मात्र, या सर्व चर्च्यांवर रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टीकरण दिलंय. पेट्रोल-डिझेल गाड्यांवर मोदी सरकार कोणतीही बंदी आणणार नाही. अशा वाहनांवर बंदीची सूचना केंद्रीय मंत्रालयाला प्राप्त झालीय. मात्र, केंद्राचा असा कोणताही विचार नाही, असं ते म्हणालेत.

धर्मेंद्र प्रधान यांनीही भारत अशा प्रकारची जोखीम उचलू शकत नाही, असं वक्तव्य केलंय. त्यामुळे पेट्रोल-डिझेलची वाहनं वापरणाऱ्या वाहनधारकांनी सध्या तरी काळजी करण्याची गरज नाही. मात्र, पर्यावरणाला पूरक इंधनाकडे त्यांनी येत्या काळात वळायला हवं हेही नक्कीच. 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com