Nilesh Rane यांनी Anand Dighe यांच्यावर केलेले आरोप Narayan Rane यांना मान्य नाहीत

Nilesh Rane यांनी Anand Dighe यांच्यावर केलेले आरोप Narayan Rane यांना मान्य नाहीत

मुंबई - ''शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या मृत्युबाबत मध्यंतरी जे काही आरोप झाले, ते मला मान्य नाहीत. त्यांचा मृत्यू घातपातामुळे झालेला नाही, हे मला माहित आहे, त्यामुळे या विषयावर आता पडदा पडला आहे. यापुढे या गोष्टी बोलल्या जाणार नाहीत. मी निलेश राणे यांना हे वास्तव सांगेन," असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी येथे केले.

पाहा संपूर्ण मुलाखत :: 

साम टिव्हीचे संपादक निलेश खरे यांनी भाजप -शिवसेना युती झाल्याच्या पार्श्वभूमीवर राणे यांची विशेष मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले. ते म्हणाले, "मी चुकीच्या आरोपांना साथ करणार नाही. आनंद दिघेंना शेवटचा भेटणारा मी होतो. मी गेलो तेव्हा दिघे यांची प्रकृती अत्यंत खालावली होती. मी बाहेर पडून बाळासाहेबांना फोन केला व डाॅ. नितू मांडके यांना पाठवून देण्याची विनंती केली. बाळासाहेबांनी तशी व्यवस्था केली. पण डाॅ. नितू मांडके येण्याअगोदरच दिघे यांचा मृत्यू झाला होता. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे मी बाळासाहेबांवर याबाबत आधी जे आरोप झाले, त्याच्याशी सहमत नाही." या मुद्यावर माझ्या दृष्टीने पडदा पडला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

WebTitle :: marathi news politics exclusive narayan rane on death of anand dighe 


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com