इंजिनिअरिंग दुसऱ्या वर्षाचा प्रवेश 21 जूनपर्यंत

  इंजिनिअरिंग दुसऱ्या वर्षाचा प्रवेश 21 जूनपर्यंत

पुणे - बारावीनंतर आणि आयटीआय झाल्यानंतर अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षाला थेट प्रवेश देण्यात येतो. त्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना 21 जूनपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत, अशी माहिती तंत्रशिक्षण संचालनालयाने दिली. 

या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्‍यक असणारी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी आणि अर्जाची पडताळणी आणि निश्‍चिती करण्यासाठी 21 जूनपर्यंत मुदत आहे. राज्यातील तंत्रनिकेतनमध्ये थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेण्यासाठी ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येते. प्रवेशाच्या पहिल्या फेरीसाठी (कॅप) महाविद्यालयांचे पर्याय भरताना विद्यार्थ्यांनी "ऑटोफ्रिज' किंवा "सेल्फफ्रिज' पर्याय निवडल्यानंतर, त्यांना पहिल्या क्रमांकाचे महाविद्यालय मिळाल्यास त्याच महाविद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक असून, इतर प्रवेश फेरीत सहभागी होता येणार नाही. या प्रवेशाचा "कट ऑफ' हा 14 ऑगस्टला जाहीर होईल. 

तीन प्रवेश फेऱ्या  
अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाला थेट प्रवेश घेण्यासाठी जवळपास तीन प्रवेश फेऱ्या होणार आहेत. या प्रवेश प्रक्रियेबाबत अधिक माहिती "http://www.dtemaharashtra.gov.in' या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

महत्त्वाच्या तारखा 
- अर्ज करण्याची मुदत : 21 जून 
- कागदपत्रे पडताळणी, अर्जनिश्‍चिती : 21 जून 
- प्राथमिक गुणवत्ता यादी जाहीर करणे : 24 जून 
- यादीबाबत आक्षेप नोंदविणे : 25 आणि 26 जून 
- अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करणे : 27 जून 

पहिली प्रवेश फेरी (कॅप राउंड) 
- प्रवेशासाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : 27 जून 
- महाविद्यालयांचे पर्याय भरणे : 28 जून ते 1 जुलै 
- प्रोव्हिजनल ऍलॉटमेंट जाहीर करणे : 3 जुलै 
- प्रवेश निश्‍चित करणे : 4 ते 7 जुलै 
- प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन शुल्क भरून प्रवेश घेणे : 4 ते 8 जुलै 

दुसरी प्रवेश फेरी  
- प्रवेशासाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : 10 जुलै 
- महाविद्यालयांचे पर्याय भरणे : 11 ते 14 जुलै 
- प्रोव्हिजनल ऍलॉटमेंट जाहीर करणे : 16 जुलै 
- प्रवेश निश्‍चित करणे : 17 ते 20 जुलै 
- महाविद्यालयांत जाऊन शुल्क भरून प्रवेश घेणे : 17 ते 21 जुलै 

तिसरी प्रवेश फेरी  
- प्रवेशासाठी रिक्त जागांचा तपशील जाहीर करणे : 23 जुलै 
- महाविद्यालयांचे पर्याय भरणे : 24 ते 27 जुलै 
- प्रोव्हिजनल ऍलॉटमेंट जाहीर करणे : 30 जुलै 
- प्रवेश निश्‍चित करणे : 31 जुलै 
- महाविद्यालयात जाऊन शुल्क भरून प्रवेश घेणे : 31 जुलै ते 4 ऑगस्ट 

Web Title: Engineering second year entry till June 21

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com