मुंढव्यातील केशवनगरमध्ये बिबट्याचा तिघांवर हल्ला

मुंढव्यातील केशवनगरमध्ये बिबट्याचा तिघांवर हल्ला

पुणे : पुणे शहराच्या वेशीवर म्हणजे मुंढव्यातील केशवनगरमध्ये बिबट्याने तिघांवर हल्ला करून जखमी केल्याची माहिती मिळत आहे. वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंढवा परिसरातील रेणुकामाता मंदिर ,केशवनगर येथे बिबट्याच्या हल्ल्यात ३ ते ४ जण जखमी झाले आहेत. आज (सोमवारी) सकाळी 7.00 वाजता सुभद्राबाई तारु (वय 80) यांनी मोठ्याने ओरडून स्वतःची सुटका  करून घेतली. तसेच एका लहान मुलीला बिबट्या ओढून नेत असताना तेथील तरुण मुलांनी सोडवले. या गोंधळाच्या वातावरणात दोघांवर जबरी हल्ला चढवला. नागरिकांच्या गडबड आणि आवाजामुळे मंदिराजवळील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या खड्ड्यात पडला आहे. वनविभागाचे अधिकारी आणि पोलिस जागेवर पोहचले आहेत. परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मुंढवा मांजरी हद्दीच्या भागात मिलिटरी डेअरीचा भाग आहे. त्याठिकाणी घनदाट झाडी आहे. त्या ठिकाणाहून बिबट्या केशवनगर भागात आल्याचा अंदाज आहे. 

बिबट्याने तिघांवर हल्ला केला असून, या सगळ्यांना केशवनगर भागातील एका दवाखान्यात प्राथमिक उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते, आता त्यांना घरी सोडण्यात आले आहे. कोणीही गंभीर जखमी नाही.

Web Title:  leopard attacked the trio in pune

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com