मजुराच्या गळ्याला अजगराचा फास अन् अजगराच्या तावडीतून मजुराच्या सुटकेचा थरार

मजुराच्या गळ्याला अजगराचा फास अन् अजगराच्या तावडीतून मजुराच्या सुटकेचा थरार

तिरुअनंतपुरम : साप आणि अजगर हे तसे निरुपद्रवी प्राणी... मात्र यांना जाणूनबुजून त्रास दिल्यास त्यांच्यासारखं जहाल कोणी नाही... सर्पदंश आणि अजगराच्या विळख्याने तर भल्याभल्यांना आपल्या प्राणासही मुकावं लागलंय... तरीही या मुक्या जनावरांना त्रास देण्याची अनेकांची
खोड काही जात नाही...

अशाच खोडकर वृत्तीमुळे एका व्यक्तीचा जीव टांगणीला लागलाय.. केरळच्या तिरुअनंतरपुरममध्ये एका मजुराला झाडं तोडण्याचं काम दिलं होतं..
मात्र ही झुडपं उद्धवस्त करताना, या गर्द हिरवाईत पहुडलेल्या अजगराला त्रास झाला... राहतं निवासस्थान नष्ट होत असल्याचं पाहून, थेट अजगराने या मजुरावरच झेप घेतली... 
मजुराच्या मानगुटीवर बसत, अजगराने त्याच्या मानेभोवती आपला फास आवळण्यास सुरुवात केली... या अनपेक्षित प्रकाराने हादरलेल्या मजुराने, जिवाच्या आकांताने मदतीसाठी
पुकारा करण्यास सुरुवात केली... मजुराची अशी दयनीय स्थिती पाहून, आसपासच्या नागरिकांनी सुटकेसाठी धडपड सुरू केली.. पण ही एका अजगराची पकड होती.. ज्या पकडीत
वाघ, सिंहासारखे अजस्त्र प्राण्यांनी आपला जीव गमावलाय...तिथे या मजुराचा तो काय निभाव लागणार... पण ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न केले...  कुणी त्याला शेपटापासून ओढलं, 
तर कुणी अजगराच्या जबड्यात काठी फसवण्याचा प्रयत्न करु लागलं... अखेरीस या अजगराची मानेवरील पकड सैल करण्यात यश मिळालं, अन् गळा मोकळा 
झालेल्या या हतप्रभ मजुराने सुटकेचा दीर्घ श्वास घेतला...

तिरुअनंतपुरममध्ये सध्या मनरेगा अंतर्गत झाडं तोडण्याचं काम सुरू आहे... पोटाची खळगी भरण्यासाठीची ही मेहनत मात्र मजुराचा अंत पाहणारी ठरली असती... 
ग्रामस्थांनी या अजस्त्र अजगराला तात्काळ वनविभागाच्या स्वाधीन केलं आहे... प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासात घुसखोरी करताना, प्रत्येकाने सावधानता बाळगणं तितकंच महत्त्वाचं आहे...
नाहीतर तुमचीही या मजुरासारखी गत होऊ शकते, हे लक्षात ठेवा!
 

Wb Title - PYTHEN ATTACK ON OLD MAN 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com