राज ठाकरे बदलणार भूमिका? राज आता खेळणार भगवी खेळी?

राज ठाकरे बदलणार भूमिका? राज आता खेळणार भगवी खेळी?

राज ठाकरे हिंदुत्वाच्या राजकारणाकडे झुकणार अशी चर्चा अनेक दिवस रंगलीय. त्याच पार्श्वभूमीवर राज आपली भूमिका लवकरच जाहीर करणार आहेत.

विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा राजकीय कूस बदलण्याच्या तयारीत आहे. काही दिवसांत हिंदुत्वाच्या राजकारणाकडे मनसे झुकण्याचे संकेत मिळतायंत. बांगलादेशी आणि पाकिस्तानी नागरिकांना हकलून द्या, अशी भूमिका राज यांनी काहीच दिवसांपूर्वी मांडली होती. याच भूमिकेनंतर चर्चांना उधाण आलंय.

शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. त्यामुळे शिवसेनेपासून दुखावलेला कट्टर हिंदुत्ववादी वर्ग मनसेकडे खेचण्याची रणनीती आखण्यात येतेय. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीदिनी मनसेचं पहिलं महाअधिवेशन आयोजित करण्यात आलंय. त्यात राज भूमिका स्पष्ट करणार आहेत.

काही वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींची स्तुती करणाऱ्या राज यांनी लोकसभा-विधानसभेत प्रखर मोदीविरोधाची भूमिका घेतली. मात्र या भूमिकेतनं राज यांना कोणताच भरीव फायदा झाला नाही. त्यामुळेच आता मनसे राजकीय भूमिका बदलणार अशी चर्चा रंगलीय. त्यातच नागरिकत्व कायद्यावरनं राज यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे राज महाअधिवेशनात काय बोलणार याकडे सत्ताधारी शिवसेनेबरोबरच विरोधी भाजपचंही लक्ष लागलंय.

Web Title - Raj Thakeray changing his role about party.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com