रजनीकांतची फसवणूक... मागवला आयफोन आणि मिळाला नकली फोन...

रजनीकांतची फसवणूक... मागवला आयफोन आणि मिळाला नकली फोन...

बंगळुरू : आजकाल ऑनलाईन शॉपिंगची क्रेझ वाढलीय. घरी बसल्या बसल्या वस्तू ऑर्डर करायच्या, आणि ती घरपोच मिळाल्यावर वापरायच्या. ना मार्केटपर्यंत जाण्याचं टेन्शन. ना वेळेचा अपव्यय. मात्र या वेळ वाचवण्याच्या नादात अनेकवेळा फसवणूक झाल्याचंही समोर आलंय. असंच काहीसं घडलं बंगळुरूच्या रजनीकांत सोबत त्यानं ऑनलाईन आयफोन मागवला, त्याला मात्र बनावट फोन मिळाला.

बंगळुरूतील रजनीकांत कुशवाह यांनी ऑनलाईन शॉपिंगद्वारे आयफोन 11 प्रो मागवला. पोशानं सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्यानं कामातून वेळ मिळत नसल्यानं रजनीकांत यांना ऑनलाईनचा पर्याय सोपा वाटला. त्यामुळे रजनीकांत कुशवाह यांनी फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईटवरुन अॅपलचा फोन ऑर्डर केला. त्यांनी आयफोनसाठी कंपनीला ऑनलाईन पेमेंट करत, 93,900 रुपये ट्रान्सफर केले.  आणि आयफोनची डिलीव्हरी होण्याची वाट बघू लागले. तसा 4-5 दिवसात तो फोन डिलीव्हर सुद्धा झाला.  रजनीकांत यांनी अगदी उत्साहात हा फोन अनपॅक केला. आणि त्यांच्या पायाखालची जमिनच सरकली, कारण लाखभर रुपये देऊन खरेदी केलेला हा फोन, ओरिजनल आयफोन नव्हता. तर त्या मोबाईलचा कॅमेरा आणि स्क्रीन नकली होती..  विशेष म्हणजे या मोबाईलचं सॉफ्टवेअरही iOS नव्हतं. रजनीकांत कुशवाह सॉफ्टवेअर इंजिनिअर असल्यानं त्यांनी लगेच ही बाब हेरली. आणि आपली सपशेल फसवणुक झाल्याचं लक्षात आलं. यानंतर रजनिकांत यांनी फ्लिपकार्ट कंपनीला संपर्क करुन आपली फसवणूक झाल्याचं सांगितलं.  कंपनीनं त्यांना फोनची रिप्लेसमेंट करण्याचं आश्वासन दिलं. मात्र, अद्यापही त्यांना ओरिजनल फोन मिळालेला नाही.

बंगळुरूतले रजनीकांत कुशवाह इंजिनिअर असल्यानं असली-नकली मधील फरक समजू शकले. इतर ग्राहकांचीही तशी फसवणुक होत असेल..मात्र तुमच्या आमच्या सारखा सामान्य माणसांना फरक तो कसा कळणार? त्यामुळे महागड्या वस्तु ऑनलाईल मागवताना सतर्क रहा....

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com