शिवसेना भाजप-युती तुटणार फक्त घोषणा बाकी! सेनाही NDAतून लवकरच बाहेर पडणार

शिवसेना भाजप-युती तुटणार फक्त घोषणा बाकी! सेनाही NDAतून लवकरच बाहेर पडणार

मुंबई : राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असताना शिवसेना-भाजप युतीमधील "मन'भेद चव्हाट्यावर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून सत्ता स्थापन करणार नसल्याचे सांगण्यात आले. तर, शिवसेनेला काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापनेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. अशावेळी युती तुटल्याचे स्पष्ट दिसत असले तरी मात्र, युती तुटल्याचे अधिकृतरित्या कोणीही जाहीर केलेली नाही.

आज (ता.10) दुपारी झालेल्या शिवसेना आमदारांच्या बैठकीत मात्र, शिवसेनेकडून युती तोडण्यात आली नसल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. "आमचं ठरलंय' असा एकीचा सूर आळविणाऱ्या या दोन्ही मित्र पक्षांमध्ये चांगलेच बिनसले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यपालांकडे राजीनामा सादर केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शिवसेनेवर निशाणा साधला, अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद शिवसेनेला देण्याबाबत कसलाही निर्णय झाला नव्हता, अगदी अमित शहांनी देखील हेच मला सांगितले होते, असा दावा त्यांनी त्यावेळी केला होता.

या पार्श्‍वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांना धारेवर धरले होते. कुणीतरी प्रथमच ठाकरे कुटुंबाला खोटे ठरविण्याचा प्रयत्न करत असून, गोड बोलून शिवसेनेला संपविण्याचा भाजपचा डावा होता असा घणाघात त्यांनी केला होता. त्यानंतर मात्र, दोघांकडूनही युती तुटल्याचे जाहीर करण्यात आले नव्हते. परंतु, आज युती तुटल्याची अधिकृत घोषणा भाजपकडून करण्यात आली.

दरम्यान, राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यावर भाजप सरकार स्थापन करणार नसल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.

Web Title: Sena BJP Alliance break after Vidhan Sabha election

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com