उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात रात्री काय शिजलं?

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात रात्री काय शिजलं?
SHARAD PAWAR AND UDDHAV THAKAREYS FINEL DISISION ONM CM OF MAHARASHTRA.

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणासाठीचा आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज महाविकास आघाडी सत्तास्थापनेचा दावा करण्याची दाट शक्यताय. मात्र त्याआधी काल रात्री नाट्यमय घडामोडी मुंबईत घडल्यात. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. मुंबईतल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. रात्री 11.30 वाजता उद्धव ठाकरे शरद पवारांच्या निवासस्थानी पोहोचले. तेव्हापासून पवार-ठाकरे यांच्यात चर्चा सुरु झाली. ही चर्चा बराच वेळ सुरु होती. ही बैठक बरोबर रात्री सव्वाबारा वाजता संपली. तब्बल सव्वा तास ठाकरे-पवार भेट चालली. सत्तास्थापनेबाबत निर्णायक चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती समोर येतेय.  शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते गुरुवारी रात्री मुंबईत दाखल झाले. दरम्यान, पवार मुंबईमध्ये दाखल होताच उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि संजय राऊत पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी पोहोचले. दरम्यान यावेळी कॉंग्रेसचा एकही नेता उपस्थित नव्हता हे देखील विशेष. दरम्यान, पवार आणि ठाकरेंमध्ये झालेल्या बैठकीत समाधानकारक चर्चा झाल्याचे संकेत मिळताएत. माध्यमांशी न बोलताच उद्धव ठाकरे बैठक संपल्यानंतर निघून गेले. आज काँग्रेसच्या गटनेता निवडीनंतर महाविकास आघाडीकडून सत्तास्थापनेचा दावा करण्यात येणार असल्याचं माहिती समोर येतेय. 

महाविकास आघाडीकडून येत्या 48 तासात सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता...आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत महाआघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची शिवसेनेसोबत बैठक होणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. यानंतर राज्यपालांना तसं पत्र दिलं जाईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिलीय. 

WEB TITLE - SHARAD PAWAR AND UDDHAV THAKAREYS FINEL DISISION ONM CM OF MAHARASHTRA...

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com