शिर्डीच्या साईबाबांचं नाव मतदार यादीत 

शिर्डीच्या साईबाबांचं नाव मतदार यादीत 

शिर्डीच्या साईबाबांचं नाव मतदार यादीत समाविष्ट केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिर्डीतील मतदार यादीत अवैधरित्या साईबाबांचं नाव नोंदविण्यात आलं आहे. 

साईबाबांचं नाव मतदार यादीत नोंदविण्यासाठी इरो-नेट या ऑनलाईन प्रणालीचा गैरवापर करण्यात आला आहे. 

1 जानेवारी रोजी हा सगळा प्रकार उघड झाला होता. कारवाई करण्यासाठी पोलिसांनी केलेल्या दिरंगाईमुळे गुन्हा उशिरा दाखल झाला आहे. 

शिर्डीच्या साईबाबांचे नाव मतदार यादीत समाविष्ट करण्यासाठी नमुना नंबर 6 भरला होता. यासाठी पत्ताही साईमंदिर शिर्डी असा दिला होता. छाननी करीत असताना हा प्रकार नायब तहसीलदार एस.एच.म्हस्के यांच्या लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ राहाता पोलिसांना या बाबत कळविले होते.

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com