VIDEO | शिवसेनेचं ऑपरेशन लोटस; काय आहे ऑपरेशन लोटस ?

VIDEO | शिवसेनेचं ऑपरेशन लोटस; काय आहे ऑपरेशन लोटस ?

मुंबई : मावळत्या विधानसभेची मुदत संपायला अवघे २४ तास शिल्लक राहिलेत. नव्या विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपला सत्ता स्थापनेचा दावा करणं अशक्य झालंय. कारण शिवसेनेच्या तिरक्या चालीचा काही केल्या भाजपला अंदाज येत नाहीए.

शिवसेनेची आक्रमक भूमिका पाहता शिवसेनेकडे एकापेक्षा अधिक पर्याय असल्याचं दिसून येतंय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या अटींवरच सत्तेत सहभागी व्हायचं, अशी सेनेची भूमिका आहे. तसं न झाल्यास सत्ता स्थापनेचा दावा न करता भाजपने अल्पमतातलं सरकार स्थापन करण्याची शिवसेना वाट पाहिल. 

सरकार स्थापन झाल्यानंतर आगामी अधिवेशनात बहुमत सिद्ध करण्यात भाजप अपयशी ठरल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने काँग्रेसच्या पाठिंब्यावर सरकार स्थापनेचा शिवसेनेचा प्रयत्न असेल. तसं झाल्यास आपण युती तोडली नाही, असा दावा करणं सेनेला सोयीचं होईल. शिवाय राष्ट्रपती राजवट किंवा मध्यावधी निवडणुका टाळण्यासाठी नाईलाजास्तव काँग्रेस आघाडीचा पर्याय स्विकारला अशी बतावणीही शिवसेनेला करता येईल. 

सेनेच्या या 'ऑपरेशन लोटस'चं यशापयश भाजपच्या पुढच्या हालचालींवर अवलंबून आहे. शिवसेनेच्या अपेक्षेनुसार घडामोडी घडल्यास भाजपवर सत्तेपासून दूर राहण्याची नामुष्की येण्याची शक्यता आहे.

Web Title : Shivsena Mission Lotus 

Related Stories

No stories found.
Latest and Breaking News in Marathi | Live Marathi News Updates | live tv streaming in Marathi | Saam TV
www.saamtv.com