संजय राऊतांचा भाजपाला चिमटा

संजय राऊतांचा भाजपाला चिमटा

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज (बुधवार) पुन्हा एकदा आपला ट्विट कार्यक्रम सुरुच ठेवला असून, आज त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींची कविता ट्विट केली आहे.


संजय राऊत यांनी आज आहुती बाकी, यज्ञ अधूरा, अपनो के विघ्नो ने घेरा, अंतिम जय का वज्र बनाने, नव दधीची हड्डिया गलाए, आओ फिर से दिया जलाए, अशी अटलबिहारी वाजपेयींची कविता ट्विट करून भाजपला चिमटा काढला आहे. अपनो के विघ्नों ने घेरा असे म्हणत त्यांनी थेट भाजपा डिवचले आहे. तर, पुन्हा एकदा दिवा लावणार असेही याचा अर्थ होतो.


शिवसेनेने पहिल्यापासून मुख्यमंत्रीपदावर आपला दावा सांगितलेला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर सतत ते सांगत आले आहेत, शिवसेनेशिवाय सरकार स्थापन होऊ शकत नाही आणि मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होईल. दिल्लीत मंगळवारी सायंकाळी राऊत यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांची भेट घेतली होती. आज काँग्रेस आणि ऱाष्ट्रवादीच्या नेत्यांची दिल्लीत बैठक होत आहे. यामध्ये सत्तास्थापनेचा पेच सुटण्याची शक्यता आहे.

Web Title: Shivsena MP Sanjay Raut tweet AtalBihari Vajpayee poem

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com