आनंदाच्या क्षणी संजय राऊतांच ट्विट

आनंदाच्या क्षणी  संजय राऊतांच ट्विट

मुंबई : अखेर आज महाविकासआघाडीचे बहुमत सिद्ध होईल. शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार स्थापन होईल. या सगळ्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा मोठा वाटा होता. ते दररोज सकाळी भाजपला टोला लगावणारे ट्विट करायचे व त्यानंतर पत्रकार परिषद घ्यायचे. माध्यमांनाही त्यांच्या या गोष्टींची सवय झाली होती. आजही त्यांनी ट्विट केले आहे. काय ट्विट केलंय बघू...

संजय राऊतांनी आजही एका कवितेच्या चार सूचक ओळी पोस्ट केल्या आहेत. 'अभी तो इस बाज की असली उड़ान बाकी है, अभी तो इस परिंदे का इम्तिहान बाकी है, अभी अभी मैंने लांघा है समुंदरों को, अभी तो पूरा आसमान बाकी है' असे ट्विट संजय राऊतांनी आज केलंय. ही तर सुरवात आहे, आता तर या सगळ्याची सुरवात झाली आहे, खूप काही करणं बाकी आहे... असंच त्यांना यातून म्हणायचं असेल.

शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा अशी बाळासाहेबांची इच्छा होती. त्याप्रमाणे खुद्द त्यांचा मुलगा म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच आता मुख्यमंत्री होणार आहेत. संजय राऊत पहिल्यापासूनच सांगत होते की मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार! त्याप्रमाणे आता पाच वर्षांसाठी शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार.      

Web Title: Shivsena MP Sanjay Raut tweets on 27 Nov
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com