JNU ATTACK | राजकारणासाठी विद्यार्थ्यांचा वापर करु नका - स्मृती इराणी

JNU ATTACK |  राजकारणासाठी विद्यार्थ्यांचा वापर करु नका - स्मृती इराणी

नवी दिल्ली : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयु) गुडांनी विद्यार्थ्यांना केलेल्या मारहाणीबद्दल बोलताना केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी यावर मी आता बोलणं योग्य नसल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर करणे योग्य नसल्याचेही सांगितले.

Union Minister Smriti Irani on #JNUViolence: Investigation has begun,so will not be right to speak on it now, but Universities should not be turned into hubs of politics, neither should students be used as political pawns. pic.twitter.com/Gor1mONKuM

— ANI (@ANI) January 6, 2020

जेएनयूमध्ये रविवारी रात्री काही मुखवटाधारी गुंडांनी विद्यार्थी आणि शिक्षकांना काठ्या आणि लोखंडी रॉडने मारहाण केली. यामध्ये विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष हिच्यासह अठरा जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेचा देशभरातून विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि तज्ज्ञांनी कठोर शब्दांत निषेध करण्यात येत आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (एबीव्हिपी) कार्यकर्त्यांनीच नियोजनबद्ध पद्धतीने हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप डाव्या विद्यार्थी संघटनांनी केला आहे. देशभरातून या हल्ल्याचा निषेध करण्यात येत आहे.

स्मृती इराणी म्हणतात, की तपास सुरु झाला असल्याने सध्या त्यावर बोलणे योग्य नाही. पण, विद्यापीठ राजकारणाचे अड्डे होणे तसेच विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर करणे योग्य गोष्ट नाही. 

हिंसाचारात जखमी झालेल्या 34 विद्यार्थ्यांना एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. येथील हिंसाचार प्रकरणी दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मालमत्तेचं नुकसान, हिंसाचार केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीसीपी देवेंद्र आर्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही घटनेची दखल घेतली आहे. सोशल मीडिया आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून आम्ही माहिती मिळवत आहोत.

Web Title: JNU attack Union Minister Smriti Irani says Investigation has begun

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com