बापरे बाप केकमध्ये साप! मॉन्जिनिसच्या केकमध्ये सापडला चक्क मेलेला साप

बापरे बाप केकमध्ये साप! मॉन्जिनिसच्या केकमध्ये सापडला चक्क मेलेला साप

लातूर- आपण केक आवडीनं खातो. आणि हा केक जर मॉन्जनिजचा असाला तर तो केक आपण आणखीन आवडीनं खातो. वाढदिवशी केक कापत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी कारण केकमध्ये चक्क साप सापडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऐकून विश्वास बसणार नाही मात्र हे खरं आहे. लातुर इथं राहणारे तय्यब जमिल शेख यांनी वाढदिवसा निमित्त शहरातील मॉन्जनिज बेकरीतून ५ किलोचा केक मागावला. याच केकमध्ये मेलेला साप सापडल्यानं एकच खळबळ उडाली.

4 हजात 250 रुपयाच्या या केकमध्ये वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी शिल्लक राहिलेला केक खात असताना त्यात मृत साप आढळला. हा केक खाल्ल्यानंतर घरातील ५ जणांना मळमळ, उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरु झाला. यानंतर त्यांना शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. शेख कुटुंब याचा जाब विचारायला दुकानात गेल्यावर त्यांना तिथं  धक्काबुकी करण्यात आल्याचाही आरोप आहे. या घटनेनंतर शेख यांनी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे याची तक्रार केलीय.

असाच काहीसा प्रकार अमरावतीतही घडला होता. अमरावतीत एका वाढदिवसानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना केक वाटप करताना, त्या केकमध्ये अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. केक खाल्ल्यामुळे दोन चिमुकल्यांना उलट्या झाल्या. या घटनेमुळे विद्यार्थी भेदरले होते. गोल्डन बेकरीमधून खरेदी केलेल्या या केकची तक्रार पालकाने अन्न आणि औषध विभागाकडे नोंदविली. त्यानुसार एफडीए अधिकाऱ्यांनी दुकानातील केकचे नमुने जप्त करून ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले. राजकमल चौकाजवळील गोल्डन बेकरीतून एगलेस पॅन फू्रट केक खरेदी केले. मुलाने शाळेतील मित्र-मैत्रिणींना केक वाटले. केक खाल्ल्यावर लगेचच दोन मुलांचा मळमळ व्हायला लागली. त्यांनी उलट्याही केल्या. हा प्रकार पाहून शाळेतील शिक्षकांनी केक वाटण्यास मनाई केली. केकवरील मुदत तपासल्यावर हा केक विक्रेत्याविरोधात तक्रार करण्यात आली होती.

 पाहा व्हिडीओ - केकमध्ये साप कुठून आला?

Web title- Snake in the cake in latur

Related Stories

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com