इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक वर्षापासून बदलणार

इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रम नवीन शैक्षणिक वर्षापासून बदलणार

सोलापूर - यंदाच्या नवीन शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीचा अभ्यासक्रम बदलण्यात येणार आहे. मात्र, इयत्ता तिसरीचा अभ्यासक्रम यंदाच्या वर्षी बदलण्यात येणार नसल्याचे बालभारतीच्या वतीने जाहीर केले आहे. 

एक फेब्रुवारी २०१८ च्या पत्रान्वये राज्यात जून २०१९ या नव्याने सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये दुसरी, तिसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, बालभारतीने त्यामध्ये बदल करत १७ जानेवारीच्या पत्रान्वये केवळ दुसरी व अकरावीचा अभ्यासक्रम बदलण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे यंदाच्या नव्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता तिसरी नवा अभ्यासक्रम येणार नाही. एखाद्या वर्गाचा अभ्यासक्रम बदलण्याची सूचना शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच द्यावी लागते. मागील वर्षी तिसरीच्या अभ्यासक्रमामध्येही बदल करणे प्रस्तावित केले होते. मात्र, बालभारतीने आता या निर्णयान्वये तिसरीचा अभ्यासक्रम न बदलण्याचे ठरविले आहे. त्यामुळे यंदा दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार आहे.

Web Title: Class-II courses will change from the new academic year

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com