Solapur | मुस्लिम समाजाचा मुक मोर्चा; CAA विरोधात आंदोलन
Muslim Community Movement, Solapur 

Solapur | मुस्लिम समाजाचा मुक मोर्चा; CAA विरोधात आंदोलन

सोलापूर : नागरीकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी बुधवारी मुस्लीम समाजाने आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोंच्या संख्येने जमलेल्या समुदायाने नागरीकत्व सुधारणा कायद्याला विरोध केला. 

हजारोंचा सहभाग 
आज सकाळी शहर काझी यांच्या कार्यालयापासून मोर्चास सुरवात झाली. किडवाई चौक, बाराईमाम चौक, विजयपूरवेस, बेगम पेठमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोचला. त्या ठिकाणी शहर काझी अमजदअली काझी, इरफान शेख, मुख्तार हुमनाबादकर, एम. डी. शेख, शौकत पठाण, रियाज हुंडेकरी, रियाज खरादी, रियाज नाईकवाडी, मतीन बागवान यांच्यासह हजारो मुस्लीम समाज बांधव सहभागी झाले होते. 

राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारावर आली गदा 
नागरिकत्व सुधारक कायद्यामध्ये धर्माला कायदेशीर आधारभूत मानून त्याचा उपयोग करण्यात आला आहे. या कायद्यामुळे धर्मावर आधारित भेदभाव वाढेल व धार्मिक वाटणी होईल. त्यामुळे देशाच्या एकतेला बाधा निर्माण होईल. भारत हा सर्व धर्मांच्या लोकांना एकसारखी वागणूक देणारा धर्मनिरपेक्ष देश आहे. त्यामुळे धर्माच्या नावावर नागरिकत्व देण्यात येणार असल्याने राज्यघटनेतील मूलभूत आधारावर घाला आहे. राज्यघटनेच्या कलम 14 व 15 मध्ये कायद्याच्या दृष्टिकोनातून सर्व नागरिक समान आहेत. धर्म, जात व वंशाच्या आधारे कोणत्याही राज्याला भेदभाव करता येत नाही. हा कायदा दोन्ही सभागृहात पास झाल्यामुळे राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांवर व आधारावर गदा आली आहे. राज्यघटनेच्या विरोधी या कायद्याचा यावेळी निषेध करत हा कायदा रद्द करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. 


देशभरात होताहेत निदर्शने 
नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात आणि दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधात देशभरात जोरदार निदर्शने होत आहेत. अनेक संस्थेच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून नागरिकत्व कायदा रद्द करण्याची मागणी केली. संसदेत भाजपने बहुमताने नागरिकत्व सुधारणा विधेयक मंजूर केल्यानंतर ईशान्य भारतात तीव्र पडसाद उमटत आहेत. उत्तर भारतातील विद्यार्थी या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थी आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केला. पोलिसांनी विद्यापीठात घुसून विद्यार्थ्यांना मारहाण केली आणि शैक्षणिक साहित्याची तोडफोड केल्याचा आरोप आहे. 

Web Title: Muslim Community Movement Against CAA in Solapur 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com