महाराष्ट्रात कोट्यवधींचा चारा घोटाळा; चारा छावणी चालकांकडून प्रशासनाला चुना

महाराष्ट्रात कोट्यवधींचा चारा घोटाळा; चारा छावणी चालकांकडून प्रशासनाला चुना

महाराष्ट्रात सगळ्यात मोठा चारा घोटाळा उघडकीस आलाय. दुष्काळ, पाणी टंचाईत शेतकऱ्यांचं पशुधन जगावं यासाठी यंदा ६०० चारा छावण्या सुरु केल्या. पण याच चारा छावणीत कोट्यवधींचा मोठा घोटाळा सुरुय. बीडमध्ये तर कहर झालाय. चारा छावणी मालकांनी प्रशासनाला २ महिन्यात तब्बल ५ कोटींना गंडा घातलाय. बहुतांश छावण्या या सत्ताधारी पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या असल्यानं खळबळ माजलीय. चारा छावणीत जास्तीची जनावरं दाखवून सरकारी तिजोरीवर डल्ला मारला जात होता. 

मोठ्या जनावरांना 90 रुपये, तर छोट्या जनावरांना 60 रुपये अनुदान मिळतं, त्यामुळंच जनावरांचा आकडा वाढवून जास्तीची कमाई सुरु होती, याबद्दल कळताच उपविभागीय अधिकाऱ्यांनी कारवाई करत दोन तलाठ्यांना निलंबित केलंय. आपल्यावरही कारवाई होईल, या भीतीने नंतर छावण्यातल्या जनावरांची संख्या घटवण्यात आली. 

राज्यात भीषण दुष्काळानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलंय, तर या स्थितीचा फायदा घेत चारा छावणी मालक गब्बर होऊ पाहतायत जे दुर्दैवी आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com