दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

पुणेः  राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱया 10 वी आणि 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे, दहावीची परीक्षा 1 मार्च ते 22 मार्च 2019 या दरम्यान होणार असून, 12 वीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च या दरम्यान घेतली जाणार आहे.

परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाच्या अधिकृत www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर आजपासून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे ही परीक्षा घेण्यात येईल.

2018-19 पासून 10 वीचा पुनरचित अभ्यासक्रम असल्याने पुनर्परीक्षा देणाऱया विद्यार्थ्यांसाठी अंतिम संधी असलेले जुन्या अभ्यासक्रमाचे स्वतंत्र वेळापत्रक तयार करण्यात आलेले आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालयांकडे असणारे छापील वेळापत्रक अंतिम असेल, अन्य यंत्रणेने छपाई केलेल किंवा व्हाट्सऍपवर किंवा इतर माध्यामातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरु नये, अशी सूचनाही बोर्डाकडून करण्यात आलेली आहे.


 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com