दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावी परीक्षांचे अंतिम वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार दहावीची परीक्षा 3 मार्च ते 23 मार्च 2020 या कालावधीत घेण्यात येईल; तर बारावीची परीक्षा 18 फेब्रुवारी ते 18 मार्च 2020 या कालावधीत होईल. हे वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे.

त्यानुसार प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि इतर विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळांना; तसेच कनिष्ठ महाविद्यालयांना कळवण्यात येईल, असे शिक्षण मंडळाने जाहीर केले आहे. शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक हे केवळ विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून मिळणाऱ्या छापील वेळापत्रकानुसारच विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, असे आवाहन मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे. 

Web Title: SSC-HSC examination final timetable announced
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com