राज्यात गुरुवारपासून वादळी पाऊस

राज्यात गुरुवारपासून वादळी पाऊस

पुणे - पुण्यासह राज्यातील बहुतांश भागांमध्ये गेले दोन दिवस वादळी पावसाने काहीशी उसंत घेतली आहे. पावसाची उघडीप होताच ‘ऑक्‍टोबर हीट’चा चटका वाढला आहे. राज्यात सर्वाधिक तापमान रत्नागिरी येथे ३६.७ अंश सेल्सिअस नोंदले गेले. दरम्यान, राज्याच्या काही भागांतून मॉन्सून परतला असतानाच गुरुवार (ता. १७) पासून मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अनेक भागांत पाऊस थांबला आहे. मात्र, काही ठिकाणी दुपारनंतर ढग जमा होऊन सायंकाळी हलक्‍या ते मध्यम सरी पडत आहेत. पावसाने उघडीप दिल्यानंतर अनेक ठिकाणी तापमान ३० ते ३४ अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. 

पुण्यात उद्या बरसणार
पुणे शहर आणि परिसरात बुधवारी (ता. १६) पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रविवार (ता. २०) पर्यंत पाऊस पडण्याची शक्‍यता ५१ ते ७५ टक्के असल्याचे स्पष्ट केले. शहरात ८४ टक्के आर्द्रता असून, उन्हाचा चटका वाढल्याने बाष्पीभवनाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज आहे.
Web Title: storm rain monsoon environment maharashtra
 

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com