तानाजी सांवंत शिवसेनेला रामराम करणार?

तानाजी सांवंत शिवसेनेला रामराम करणार?

पुणे : उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांनी भाजपशी युती केली आहे. त्यामुळे भविष्यात ते शिवसेनेला जय महाराष्ट्र करणार का ? अशी चर्चा सुरु झाली आहे.

सावंत आपल्या सहा सदस्यांसह भाजपच्या गोटात गेल्यामुळे भाजपकडे 32 सदस्य झाले आहेत. राज्य मंत्रीमंडळ विस्तारात सावंत यांना संधी नाकरल्याने उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांचा वाद झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सावंत यांची भाजपा बरोबर जाण्याची भूमिका महत्वपूर्ण मानली जात आहे.

विधानसभा निवडणुकीतील सावंत यांच्या कार्यपद्धती मुळे सोलापूर जिल्ह्यातील दोन ते तीन जागावर पक्षाला फटका बसल्याचे सेना नेत्यांचे मत बनले आहे. आधीच्या मंत्रीमंडळ सावंत यांच्याकडे जलसंधारण खाते होते. त्यामुळे नव्या मंत्रीमंडळ विस्तारात सावंत यांचा समावेश होणे नक्की होते. सावंत यानाही तसा विश्वास होता. या पार्श्वभूमीवर मंत्री म्हणून समावेश न होणे ही सावंत यांच्यासाठी धक्का होता. 

Web Title - Tanaji sawant leaves shivsena?

No stories found.
Saam TV | Watch Latest Breaking News in Marathi, Live Marathi News Updates, Bollywood, Cricket, Videos & Photos
www.saamtv.com